मि निसर्ग बोलतोय


आजची कोरोनामुळे जगाची झालेली अवस्था आणि त्यावरील परिणाम ह्यातुन मानवावे काहीतरी बोध घ्यावा यासाठी निसर्गाच्या तोंडुन मानवाशी साधलेला संवाद माझ्या लेखणीतून तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न!

*मी निसर्ग बोलतोय...*

होय, आज मला व्यक्त होण्याची प्रचंड गरज आहे. कारण मानवा तू आमच्यावर म्हणजेच प्राणीमात्रांवर व एकूणच निसर्गावर जे वर्षानुवर्षे असंख्य जुलूम केलेस आणि आम्ही ते आजवर कोणताही ब्र न काढता चुपचाप सहन करत आलेलो आहोत त्याबद्दल मला आज व्यक्त व्हायचंय.

मानवा, तु किती स्वार्थी आहेस. तुझ्या स्वार्थासाठी तु आमच्यावर किती अन्याय केलेस आणि त्याबद्दल तुझ्या मनात पुसटशीही लज्जा नाही किंवा स्वत:ला दोषी म्हणवून घेण्याची वृत्ती नाही. तुझं आपलं प्रदुषण, कारखानदारी, वृक्षतोड, औद्योगीकरणाचं रहाटगाडगं चालूच आहे. जसा तु ह्या आसमंतातला भाग आहेस, तसे आम्हीपण आहोतच की रे.
आम्ही कुठवर सहन करायंच. आम्ही तुला खुपदा चांगल्यारितीने व आपुलकीने समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला, पण तु काही सुधारत नाहीयेस. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळवून ठरवलंच आहे की तुला कायमची अद्दल घडवायचीच. मग ती कोणत्याही स्वरुपात  का असेना. आमच्या परिसरात वावरण्याची तुझी मुदत केव्हाच संपलीये किंबहुना तुझी लायकीच राहीलेली नाहीये हे लक्षात घे. तु आपला घरातच बस नाहीतर तुझा अंत अटळ आहे. आजपर्यंत तूच आमच्यावर अन्याय करत आलेला आहेस आणि न्यायची अपेक्षा सुद्धा तुला आमच्याकडूनच आहे? आजपर्यंत तु बरीच संशोधनं केलीस, उपाय शोधलेस तुझ्या पापांवर, पण ह्यावेळी नाही आम्ही तुला यशस्वी होऊ देणार. तु कितीही तुझी शक्ती पणाला लाव, काहीही कर पण तुला आर्थिक आणि बौध्दिकदृष्टया आम्ही हरवून राहू. उडतेय ना तुझी धांदल मानवा, हसू येण्यापेक्षा तुझी कीवच करावीशी वाटतेय. तुझ्याएवढे क्रूर आम्ही नाही आहोत पण लातोंके भुत बातोंसे नही मानते असंच मला तुझ्याबद्दल म्हणावसं वाटतयं.

अजुनही वेळ गेलेली नाहीये. सुधरव स्वत:ला नाहीतर प्रकृती आपली गय करणार नाही. मृत्युही तसा तुझ्या उंबरठ्यावर आहेच. तुझी वाट बघतोय.


Agar aapko ye blog accha laga to please follow aur subscribe kijiye  thanks !












Post a Comment

Previous Post Next Post